पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे देण्यात येणा-या सेवांबाबतची माहिती  नागरिकांना सोप्या शब्दात, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे हा  ‘सारथी’ प्रकल्पाचा उद्देश आहे 
              .त्याचबरोबर राज्य शासन,  केंद्र शासन व महत्वाची शासकीय महामंडळे यांच्यातर्फे नागरिकांना दिल्या जाणा-या निवडक  सेवांबाबतची माहिती देखील ‘सारथी’ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. 
            महानगरपालिकेच्या  विभागांतर्फे व शासनातर्फे नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा, त्याकरिता लागणारी  कागदपत्रे, आवश्यक शुल्क, सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी व त्याबाबतची  कार्यपध्दती यांची सर्व माहिती ‘सारथी’ मध्ये एकत्रित स्वरुपात उपलब्ध करुन  देण्यात आली आहे 
            .‘सारथी’ द्वारे माहिती  नागरिकांना FAQs, Mobile app, E Book, आणि PDF Book आदी विविध माध्यमांद्वारे  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
            महानगरपालिकेतर्फे देण्यात येणा-या सेवांबाबतची अधिक  माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी महानगरपालिकेची मुख्य वेबसाईट  www.pcmcindia.gov.in पाहावी.   |